FINIX पुण्यातील स्टार्टअप लाँच करणार ‘इलेक्ट्रिक स्कूटर’

शहरात ५१ चार्जिंग सिस्टिम आणि ५ वर्ष मोफत चार्जिंगची सुविधा

0
पुणे (टॉक महाराष्ट्र विशेष) : वाहन निर्मिती क्षेत्रातील स्टार्टअप कंपनी फिनिक्स मोटोरसायकल्सच्या वतीने लवकरच इलेक्ट्रिक स्कूटर पुण्यात लाँच करण्यात येणार आहे, अशी माहिती कंपनीच्या हिंजवडी येथील संशोधन आणि विकास विभागातील सूत्रांनी दिली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, फिनिक्सच्या (FINIX) पहिल्या स्कूटरची रेंज सुमारे ९० ते १३० किलोमीटर असण्याची शक्यता असून, टॉप स्पीड ताशी ८० किलोमीटर असेल. त्याप्रमाणेच फिनिक्सच्या (FINIX) प्रस्तावित स्कूटरसह कंपनीने पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहरात तब्बल ५१ चार्जिंग सिस्टिम उभारणीसाठी काम सुरु केले असून, ग्राहकांना चक्क ५ वर्ष मोफत चार्जिंगची सुविधा देण्यात येणार आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलचे दार सातत्याने वाढत असल्यामुळे वाहन चालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वाहन चालक इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत आहेत. मात्र, इलेक्ट्रिक वाहनांची किंमत आणि चार्जिंगची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक लोक इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यास उत्सुक नसल्याचे हि चित्र आहे.

 

त्यामुळे फिनिक्सची (FINIX) मोफत चार्जिंग सुविधेसह इलेक्ट्रिक स्कूटर नक्कीच स्टार्टअपसाठी गगनभरारी असेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.