रवी दहियाची अंतिम फेरीत धडक

0

टोकीयो : ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी आणखी एक पदक निश्चित झाले आहे. कुस्तीगीर रवी कुमारने 57 किलो वजनी गटात कझाकिस्तानच्या नुरिस्लाम सनायेववर मात करत अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे भारताचे ऑलिम्पिकमध्ये चौथे पदक निश्चित झाले आहे. तर दूसरीकडे भारतीय महिला हॉकी संघाला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे संघाचे फायनलमध्ये जाण्याचे स्वप्न भंगले आहे. अर्जेंटिना सोबत झालेल्या सामन्यात भारतीय संघ 2-1 ने पराभूत झाला आहे.

पहिल्या फेरीत रवी कुमार दहियाने दोन गुणांची आघाडी घेतली मात्र त्यानंतर सनायेवने रवीला चीतपट करत थेट आठ गुणांची कमाई केली. या धक्क्यातून रवीने एक गुण कमावला. रवीने तीन गुणांची कमाई करत पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. सनायेवच्या पायाला दुखापत झाल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले. यानंतर रवीने सनायेवला चीतपट करत बाजी मारली.

#Tokyo2020#TokyoOlympics #Cheer4India@ianuragthakur@IndiaSports@[email protected]/Mcul2Iwpki

— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) August 4, 2021

खाशाबा जाधव, सुशील कुमार, योगेश्वर दत्त, साक्षी मलिक यांच्यानंतर ऑलिम्पिक पदक पटकावणारा रवी पाचवा असेल. आतापर्यंत भारताने टोकीयो ऑलिम्पिकमध्ये एक रौप्य आणि दोन कांस्यपदकांची कमाई केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.