रॉयल एनफिल्डचे Classic 350 नेक्स्ट जनरेशन मॉडल

0
नवी दिल्ली : रॉयल एनफिल्ड (Royal Enfield )ने आपली बेस्ट सेलिंग बाइक असलेल्या Classic 350 नेक्स्ट जनरेशन मॉडल येत्या ३१ ऑगस्टला लाँच करण्याची शक्यता आहे.
New Classic 350 अलिकडेच Matte Black Finish कलर ऑप्शनमध्ये रस्त्यांवर धावताना दिसली, सध्याच्या मॉडलपेक्षा नवीन Classic 350 दिसायला खूपच आकर्षक आहे. मॅट ब्लॅक फिनिश कलर आणि रेड कॉन्ट्रास्ट स्ट्राइप्समध्ये न्यू जनरेशन क्लासिक 350 खूपच खास दिसतेय. यासोबतच यामध्ये मल्टी स्पोक ड्युअल टोन अलॉय व्हील्सदेखील दिसत आहेत.
सध्याच्या Classic 350 च्या तुलनेत न्यू जनरेशन क्लासिक 350 अनेक लेटेस्ट फीचर्ससह येईल. New Royal Enfield Classic 350 च्या लीक झालेल्या फोटोंवरून यामध्ये रेट्रो स्टाइल राउंड टेललँपसोबत राउंड टर्न इंडिकेटर, रेट्रो स्टाइल राउंड हॅलोजन हेडलँपसोबत छोटा सेमी डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर देखील आहे. ही बाइक ३ व्हेरिअंटमध्ये लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिंगल सीटर, ट्वीन सीटर क्लासिक 350 आणि क्लासिक 350 सिंगल एडिशन अशा तीन व्हेरिअंटमध्ये ही बाइक लाँच होऊ शकते. सिंगल एडिशनमध्ये अलॉय व्हील्स मिळतील, तर रेग्युलर मॉडलमध्ये स्पोक व्हील्स असतील. Meteor 350 प्रमाणे यामध्ये स्टार्ट बटण असेल.
New Royal Enfield Classic 350 मध्ये Meteor 350 वापर केलेलेच इंजिन असेल, म्हणजे ही बाइकही कंपनीच्या नवीन “J” मॉड्यूलर आर्किटेक्चरवर आधारित असेल. नवीन क्लासिक 350 मध्ये बरेच फीचर्स Meteor 350 प्रमाणे असतील, तुम्ही हवं तर ही बाइक सिंगल सीटमध्ये खरेदी करू शकतात किंवा पीलियन सीट देखील लावू शकतात. बाइकमध्ये कंपनीने ३४९ cc क्षमतेचं नवीन फ्युअल इंजेक्टेड इंजिनचा वापर केला आहे, हे इंजिन २०.२ bhp पॉवर आणि २७ Nm टॉर्क जनरेट करतं. हे इंजिन ५-स्पीड गिअरबॉक्ससह येईल.
Leave A Reply

Your email address will not be published.