राज्यात डेल्टा प्लस च्या मृत्युची संख्या वाढतेय

0
मुंबई: राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या पाच मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत 66 डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांची राज्याच्या आरोग्य विभागाकडे नोंद झाली आहे. या 66 रुग्णांपैकी 5 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 3 पुरुष आणि 2 महिला आहेत. 2 मृत्यू रत्नागिरीतील आहेत तर, प्रत्येकी 1 मृत्यू बीड, मुंबई आणि रायगडमधील आहेत. मृत्यू झालेले 5 ही रुग्ण 65 वर्षांवरील असून त्या सर्वांना अतिजोखमीचे आजार होते.
या पाच जणांपैकी दोघांनी कोव्हिशील्डचे दोन डोस घेतले होते. तर, दोघांनी कोणताही डोस घेतला नव्हता. तर एकाच्या लसीकरणाबाबत राज्याला माहिती उपलब्ध झालेली नाही.
जिल्हा डेल्टा प्लस व्हेरिएंट एकूण
रुग्ण
जळगाव 13
रत्नागिरी 12
मुंबई 11
ठाणे 06
पुणे 06
पालघर, रायगड प्रत्येकी 3
नांदेड, गोंदिया प्रत्येकी 2
चंद्रपूर,अकोला, सिंधुदुर्ग, सांगली, नंदुरबार, औरंगाबाद, कोल्हापूर, बीड प्रत्येकी 1
आता पर्यंत राज्यात आढळलेल्या 66 डेल्टा प्लस रुग्णांपैकी 32 पुरुष असून 34 स्त्रिया आहेत. सर्वाधिक 33 डेल्टा प्लस रुग्ण 19 ते 45 वर्ष वयोगटातील आहेत तर त्या खालोखाल 46 ते 60 वर्ष वयोगटातील 18 रुग्ण आहेत. यामध्ये 18 वर्षांखालील 7 बालके असून 60 वर्षांवरील 8 रुग्ण आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.