मुंबई : तालिबान्यांच्या आक्रमणामुळं अनेक नागरिक अफगाणिस्तान सोडून जात आहेत. आज अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांनाही मायदेशी परत आणण्यात आलं. यासाठी भारतानं एक विमानही पाठवलं होतं. 129 भारतीय आणि इतर प्रवाशांना घेऊन एअर इंडियाच विमान भारतात दाखल झालं. या विमानात हवाई सुंदरी म्हणून महाराष्ट्रातील श्वेता शंके काबूलला गेली होती.
श्वेता शंके हे मूळची अमरावतीच्या दर्यापूरमधली आहे. अतिशय भयावह परिस्थिती असताना देखील विमानाने उड्डाण घेतलं आणि भारतीयांना घेऊन हे विमान पुन्हा भारतात दाखल झालं. श्वेताच्या या धाडसाबद्दल श्वेताचं सर्व स्थरातून कौतुक केलं जातंय.
श्वेता भारतात दाखल झाल्यानंतर राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी श्वेताला फोन केला आणि तिचं अभिनंदन केलं तसेच तिची विचारपूस केली.
तिला कुठलीही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क साधावा, असा धीर दिला.
काबूल येथील परिस्थिती अतिशय गंभीर असून जेव्हा इंडियन एअरलाइन्स विमान लँड झालं त्यावेळी फायरिंगचे आवाज येत असल्याचे श्वेता हिने सांगितलं. श्वेता अजूनही एअर क्राफ्टवर असल्याचं तिने पालकमंत्र्यांना सांगितलं आहे. अफगाणिस्तानमध्ये एअर इंडियाचं विमान पोहोचलं असताना त्याला लँडिंग करू दिलं जात नव्हतं. मात्र काही वेळानंतर हे विमान काबूलच्या एअरपोर्ट उतरलं आणि भारतीयांना सुखरूप परत देखील घेऊन आलं.