काबुल विमानतळावर १५० नागरिकांचं तालिबाननं केलं अपहरण

भारतीयांचा समावेश : एएनआय

0
काबूल : अफगाणिस्तानची सत्ता तालिबान्यांच्या हातात गेली आणि संपूर्ण जगात मोठी खळबळ माजली. १५० भारतीयांना काबूल विमानतळाबाहेर तालिबान्यांनी ताब्यात घेतलं आहे.

 

 

काबूल विमानतळाच्या प्रवेशद्वारावरुन तालिबान्यांना १५० भारतीयांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती एएनआयने दिली आहे.

 

 

 

परराष्ट्र मंत्रालय याविषयी अधिक माहिती घेत असून अजून कोणतीही प्रतिक्रिया देण्यास मंत्रालयाने नकार दिला आहे. दरम्यान, अहमदुल्लाह वसेक नावाच्या एका तालिबानी प्रवक्त्याने १५० भारतीयांचं अपहरण केलेलं नसल्याचा दावा अफगाण प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.

 

 

 

 

 

काही तासांपूर्वीच भारतीय हवाई दलाने काबूलमधून ८५ भारतीयांना बाहेर काढलं आहे.  हे विमान ताजिकीस्तानमध्ये उतरवण्यात आलं आहे. अजून एक विमान बचावकार्यासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.