शेअर बाजारात फ्रान्सला भारताने टाकले मागे; जगात सहावं स्थान

0

नवी दिल्ली  : गेल्या महिनाभरापासून सातत्याने रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या भारतीय शेअर बाजाराने फ्रान्सलाही मागे टाकत जगात सहाव्या क्रमांकाचं स्थान पटकावलंय. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक विक्रमी पातळीवर पोहोचलेले असून, शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्सने 59 हजार अशांचा टप्पा ओलांडला. अभ्यासकांच्या अंदाजानुसार सेन्सेक्स लवकरच 60 हजार अंशांचाही टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.

विक्रमी तेजीमुळे भारतीय शेअर बाजार फ्रान्सच्या शेअर बाजाराला मागे ठेवत जगातील सहावा सर्वात मोठा शेअर बाजार बनलाय. बाजारातील भागभांडवल किंवा मार्केट कॅपिटलच्या दृष्टीने भारतीय शेअर बाजाराने ३.४० ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडला.

बाजारमूल्यानुसार अमेरिकन शेअर बाजार जगात प्रथम स्थानी आहे. वॉल स्ट्रीट या अमेरिकन शेअर बाजाराचे एकूण कॅपिटल 51.3 ट्रिलियन डॉलर आहे. तर, चीनच्या शेअर बाजाराचे एकूण भागभांडवल 12.42 ट्रिलियन डॉलर आहे. जपानचा शेअर बाजार 7.43 ट्रिलियन डॉलरमुळे तिसऱ्या क्रमांकावर आहे.

हाँगकाँगचा शेअर बाजार चौथ्या स्थानी असून, त्याचे बाजारमूल्य 6.52 ट्रिलियन डॉलर आहे. त्यानंतर इंग्लंडचा शेअर बाजार पाचव्या स्थानी असून, त्याचे बाजारमूल्य 3.68 ट्रिलियन डॉलर आहे. त्यानंतर आता भारतीय शेअर बाजार सहाव्या स्थानी पोहोचलाय. त्यामुळे 3.40 ट्रिलियन डॉलरच्या मार्केट कॅपिटलमुळे फान्स सातव्या स्थानावर गेलाय.

Leave A Reply

Your email address will not be published.