पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मित्राची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या वहिनीला नेवून, तिच्यावर मित्राने बलात्कार केला. त्यानंतर दिराने स्वतः शरीर सुखाची मागणी केली असता त्यास नकार दिल्याने वाहिनीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मावळ येथील देहूरोड हद्दीत असलेल्या जुना पुणे मुंबई महामार्गावरील घोरावडेश्वर डोंगरावर आज (साेमवार) पहाटे उघडकीस आली.
याप्रकरणी एका युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिताली धडस असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर तुकाराम धडस (रा.देहूरोड, मूळ माण, सातारा) याला अटक केली आहे. अक्षय कारंडे हा फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार; तुकारामच्या मित्राने फोन करुन आपण बुधवार पेठेत जाऊन मज्जा करूया असे सांगितले. त्यावर तुकारामने मित्राला येथेच मज्जा करू, मी सर्व व्यवस्था केली आहे असे सांगितले.
तुकाराम आणि अक्षय या दोघांनी मिताली हिला घोरवडेस्वर डोंगरावर नेले. जबरदस्तीने अक्षयने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तुकारामने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली असता त्यास तिने नकार दिला. यातून चिडून ओढणीने तिचा गळा आवळून, दगडाने ठेचून खून केला. तपास तळेगाव पोलिस करीत आहेत.