गँगस्टर सुरेश पुजारीला फिलिपिन्सच्या पॅराकॅक शहरात अटक

धागेदोरे पुणे व परिसरात

0

नवी दिल्ली : देशातील वेगवेगळ्या ठिकाणी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेला फरार गँगस्टर सुरेश पुजारी अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. फिलिपिन्सच्या पॅराकॅक शहरात fbi इनपुटच्या आधारे अटक करण्यात आलेली आहे. गँगस्टर पुजारी याचे धागेदोरे पुणे परिसरात विखुरलेले आहेत.

भिवंडी गोळीबार, खंडणी, दहशत माजविणे यासारखे अनेक गुन्ह्यात सहभाग असलेला आणि भारतातून पळून गेलेल्या पुजारीला भारतीय पोलीस शोधत होते.
फिलिपिन्सच्या पॅराकॅक सिटी पोलिसांच्या Intelligence Section, Fugitive Search Unit Bureau of Immigration आणि Intelligence Service of Philippines च्या सशस्त्र दलाच्या FBI च्या इनपुटच्या आधारावर परकीय संशयिताबद्दलची माहिती मिळाली होती. त्याआधारे त्याला अटक करण्यात आलेली आहे.

फरार गँगस्टर सुरेश पुजारी यांनी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देणाऱ्या हॉटेल व्यावसायिक आणि व्यावसायिकांना लक्ष्य केले होते. ठाणे खंडणीविरोधी सेल (एईसी) ने जानेवारी 2018 मधील भिवंडी गोळीबार प्रकरणात अटक केलेल्या आरोपींसोबत पुजारीचे नाव आले होते.

यामुळे भारतीय पोलीस त्याच्या मागावर होते. पॅराकॅक पोलिसांनी अटक केल्यानंतर आता भारतीय, महाराष्ट्र पोलीस त्याचा ताबा घेण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. 

Leave A Reply

Your email address will not be published.