फायर ऑडिट झाले होते…जिल्हाधिकारी

0

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील अति दक्षता विभागाला आज सकाळी साडेदहा वाजता शॉक सक्रीट मुळे आग लागली. या विभागात १७ कोवीड रूग्ण दाखल होते.

यापैकी दहा रूग्णांच्या होरपळून मृत्यू झाला तर १ रूग्ण अत्यवस्थ आहे. इतर रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे‌ अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले यांनी दिली.

जिल्हाधिकारी भोसले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली आहे. भोसले म्हणाले, नाशिक येथे झालेल्या गॅस गळतीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यात आले होते.

मात्र तरीही दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबतची चौकशी करण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.