१० वी १२ वी असणाऱ्या बेरोजगारांसाठी सरकारी नोकरीची संधी

0

नवी दिल्ली : इंडिया पोस्टने मध्य प्रदेश पोस्टल सर्कल (इंडिया पोस्ट मध्य प्रदेश सर्कल भर्ती 2021) मध्ये स्पोर्ट्स कोटा अंतर्गत रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेद्वारे, पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन आणि मल्टी टास्क स्टाफ (MTS) च्या ४४ पदांची भरती केली जाणार आहे.

पात्र आणि इच्छुक उमेदवार इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइट http://www.indiapost.gov वर जाऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात.यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ०३ डिसेंबर २०२१ आहे. या पदांसाठी राज्यस्तरीय किंवा देशस्तरीय स्पर्धा किंवा आंतरविद्यापीठ स्पर्धेत सहभागी झालेले उमेदवारच अर्ज करू शकतात.

वेतनमान

पोस्टल सहाय्यक : लेव्हल ४ अंतर्गत २५,५०० ते ८१,१०० रुपये

शॉर्टिंग असिस्टंट : लेव्हल ४ अंतर्गत २५,५०० ते ८१,१०० रुपये

पोस्टमन : लेव्हल ३ अंतर्गत २१,७०० ते ६९,१०० रुपये

एमटीएस : लेव्हल १ अंतर्गत रु. १८,००० ते ५६,९००

वयोमर्यादा

पोस्टल असिस्टंट/पोस्टमन पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्षे असावे.उमेदवाराचा जन्म ०२ जानेवारी १९९४ ते ०१ जानेवारी २००३ दरम्यान झालेला असावा.

एमटीएस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षांच्या दरम्यान असावे. उमेदवाराचा जन्म ०२ जानेवारी १९९६ पूर्वी आणि ०१ जानेवारी २००३ दरम्यान झालेला असावा.

राखीव प्रवर्गासाठी सरकारी नियमानुसार सवलत दिली जाते. इतर मागासवर्गीयांना ३ वर्षांची आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता

पोस्टल असिस्टंट, शॉर्टनिंग असिस्टंट आणि पोस्टमन या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून १२वी पास असावा आणि त्याच्याकडे क्रीडा पात्रता असली पाहिजे.

तर, एमटीएस पदासाठी अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी उत्तीर्ण असावेत. तसेच उमेदवारांकडे क्रीडा पात्रता असली पाहिजे.

इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in ला भेट द्या. होमपेजवर दिसणार्‍या रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
आता मध्य प्रदेश पोस्टल सर्कल भर्तीच्या लिंकवर क्लिक करा.
त्यावर क्लिक केल्यावर नोटिफिकेशन ओपन होईल. नोटिफिकेशनच्या शेवटी एक फॉर्म आहे, तो डाउनलोड करा.
आता अर्जाची प्रिंट काढा आणि फॉर्म भरा.
फॉर्मसोबत आवश्यक कागदपत्रे जोडा
आता हा फॉर्म योग्यपद्धतीने “सहाय्यक संचालक (भर्ती) कार्यालय मुख्य पोस्टमास्टर जनरल, मध्य प्रदेश सर्कल, डाक भवन, भोपाळ-४६२०१२” या पत्यावर पाठवा.

Leave A Reply

Your email address will not be published.