द्रुतगती मार्गावर भिषण अपघातात तीन कामगारांचा मृत्यू

0

खोपोली : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भिषण अपघातामध्ये मार्गावर काम करणार्‍या तीन कामगारांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभिर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर किमी 36 याठिकाणी रस्त्याच्या मधोमध एक सिमेंटचा बलकर (टँकर) काँक्रिटीकरण कामासाठी उभा होता. यावेळी भरधाव आलेल्या खाजगी प्रवासी बसची या टँकरला धडक बसली तरी अन्य दोन वाहने बसवर आदळल्याने हा भिषण अपघात झाला. यामध्ये रस्त्यावर काम करणार्‍या दोन कामगारांचा जागीच तर एकाचा उपचारासाठी घेऊन जात असताना मृत्यू झाला.

दोन गंभिर जखमींवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बस मधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करत अन्य बसमधून त्यांना मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले.

मृत झालेल्या तीनही व्यक्ती महामार्गावर काम करणारे कामगार आहेत. अपघाताची माहिती समजताच, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्यची ऍम्ब्युलन्स व्यवस्था, बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, ॲप्सकॉन कंपनीचे कर्मचारी, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य तसेच मृत्युंजय देवदूत यांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य केले. या अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजुला करत मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.