वुहानच्या प्रयोगशाळेतूनच कोरोना विषाणुची उत्पत्ती; शास्त्रज्ञांचा दावा

0

लंडन :चीनच्या वुहान प्रयोगशाळेतूनच कोरोना विषाणुची उत्पत्ती करण्यात आली आहे, असा दावा काही संशोधकांनी नुकताच केला आहे. महामारीच्या काळात चीनच्या वुहान प्रयोगशाळेतूनच कोरोनाचा विषाणू मोठ्या प्रमाणात जगभर पसरला असल्याची अधिक शक्यता आहे, असं मत कॅनडाच्या हाऊस ऑफ काॅमन्स सायन्स अँड टेक्नाॅलाॅजी समितीच्या शास्त्रज्ञ सदस्यांनी संसदेतील विरोधी पक्षाच्या खासदारांना सांगितले आहे.

या संदर्भात जीन थेरपी व सेल इंजिनियरिंगच्या तज्ज्ञ आणि ‘व्हायरल : द सर्च फॉर द ओरिजिन ऑफ कोविड-19’च्या सह-लेखिका डॉ. अलिना चॅन यांनी संशोधनातील पुरावे सादर करण्याना संसदीय समितीसमोर त्यांनी सांगितले की, “कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव हा त्याच्या अद्वितीय वैशिष्ट्यांमुळे होत आहे. त्याला ‘फुरिन क्लीवेज साईट’ असंही म्हणतात, जे चीनमधील वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायराॅलाॅजीशी जोडलेला दिसून आला आहे.

संबंधित संसदीय समितीने (London) त्यांना अधिक माहिती विचारली असता डॉ. अलिना चॅन म्हणाल्या की, “कोरोना विषाणुच्या नैसर्गिक उत्पत्तीपेक्षा प्रयोगशाळेतून झालेल्या उत्पत्तीचे प्रमाण जास्त आहे. वुहानच्या सी-फूड मार्केटमुळे कोरोना विषाणुच्या प्रादुर्भाव वाढला. ही घटना मानवनिर्मित होती, हे आम्ही मान्य करतो. पण, त्या मार्केटमध्ये कोरोना विषाणुची नैसर्गिक उत्पत्ती झाली आहे, असे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. द लॅंसेट मेडिकल जर्नलचे मुख्य संपादक रिचर्ड हाॅर्टन यांनी शास्ज्ञज्ञांच्या म्हणण्याला दुजोरा दिलेला आहे. “कोरोना विषाणुच्या उत्पत्तीमागे प्रयोगशाळा असण्याची शक्यता आहे. ज्याला जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून गांभिर्याने दखल घेऊन तपास करायला हवा”, असंही द लॅंसेट मेडिकल जर्नलचे मुख्य संपादक हाॅर्टन यांनी सांगितलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.