मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून त्याचा राज्याच्या पोलीस दलातही शिरकाव झाला आहे. तिसर्या लाटेत राज्यातील १ हजार ३९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर काही IPS सह ३१६ अधिकार्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. गेल्या २४ तासात राज्यात २७६ पोलीस कोरोनाबाधित झाले आहे.
लोकांनी गर्दी करु नये, म्हणून पोलिसांना रस्त्यावर उतरुन बंदोबस्त करावा लागतो आहे. अशाच कोरोना संसर्ग वाढत आहे. दुसरीकडे ५५ वर्षांवरील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना वर्क फार्म होम देण्याचे राज्य शासनाच्या सूचना आहेत.
त्यामुळे बंदोबस्त व नियमित कामे यासाठी मनुष्यबळ उपलब्ध होण्याचा अडचणी सुरु झाल्या आहेत. अनेक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी एकाचवेळी कोरोना बाधित झाल्याने ते विलगीकरणात गेले आहेत. अशी परिस्थित मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरांमध्ये उद्भवू लागली आहे.
त्यात १०० हून अधिक पोलिसांचा मृत्यु झाला आहे. नुकताच मुंबई आणि ठाणे शहरात २ पोलिसांचा मृत्यु झाला आहे.