जुगाडू जिप्सी बनविणाऱ्या सांगलीच्या ‘रँचो’ला आनंद महिंद्रानी दिली ‘बोलेरो’

0

सांगली : किक स्टार्ट जुगाडू जिप्सी बनविणाऱ्या सांगलीच्या दत्तात्रय लोहार यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. लोहार यांचा जुगाड पाहून महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी प्रभावी होऊन त्यांना नवीन बोलेरो देण्याचे घोषित केले. आनंद महिंद्रा यांनी सांगितल्याप्रमाणे लोहार यांना नवीकोरी बोलेरो मिळालेली आहे. आनंद महिंद्रा यांनी दिलेला शब्द खरा केला. यामुळे आज लोहार कुटुंबीय आनंदी आहेत.

दत्तात्रय यांचा मिनी जिप्सी तयार करण्यासाठी दत्तात्रय लोहार यांनी प्रचंड मेहनत घेऊन ही मिनी जिप्सी बनवली आहे.आपल्या मुलीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ध्येयवेड्या  दत्तात्रयने गाडी तयार करण्यासाठी स्वतःच्या शेतातील ऊस विकून गाडीचे साहित्य आणले. कुटुंबातील सर्वांची साथ मोलाची लाभली. विशेष बाब म्हणजे दत्तात्रय हा शाळाही  शिकलेला नाही. परंतु त्याच्या प्रबळ इच्छशक्तीमुळे तो मिनी जिप्सी तयार करू शकला. दत्तात्रय लोहार याची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. फॅब्रिकेशनचा त्याचा  व्यवसाय आहे. ते कामही त्याने फॅब्रिकेशन दुकानात बघून  शिकला आहे.मिनी जिप्सी तयार केल्यामुळे त्याचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.

आनंद महिंद्रा यांचे ट्विटदत्तात्रय लोहार यांच्या मिनी जिप्सीचा व्हिडिओ पाहून आनंद महिंद्रा यांनी दत्तात्रय यांनी बनवलेल्या गाडीच्या बदल्यात मी त्यांना बोलेरो गाडी देईन व त्यांची गाडी कंपनीच्या रिसर्च व्हॅली मध्ये प्रदर्शनास ठेवणार असे ट्विट केले होते.

राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी मतदार संघातील व स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मभूमितील दत्तात्रय लोहार यांचे कौतुक केले. यासाठी कुटुंबातील सर्वानी कष्ट घेतले. दत्तात्रय लोहार यास लागेल ती मदत करण्याचे कदम यांनी सांगितले. तसेच सत्तर हजार रुपयांचा धनादेशही त्यांना सुपूर्त केला. दत्तात्रयच्या मिनी जिप्सीतुन कृषिराज्यमंत्री विश्वजित कदम यांनी फेरफटका ही मारला तसेच आनंद महिंद्रा यांचे मानले आभार.

Leave A Reply

Your email address will not be published.