वर्ध्याच्या सेलसुरामध्ये भीषण अपघात; भाजप आमदारांच्या मुलासह सात वैद्यकीय विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

0

वर्धा : वर्ध्याच्या सेलसुरामध्ये एका चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला आहे. वाहन चालकाचा ताबा सुटल्याने नदी पुलावरूनकार  खाली कोसळून अपघात झाला. यामध्ये सावंगी येथील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या सात विद्यार्थ्यांचा जागीचमृत्यू झाला आहे. हे सर्व सावंगी येथील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी होते. यामध्ये भाजप आमदार विजयराहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले यांचाही मृत्यू झाला आहे

वर्ध्यामधील सेलसुरामधे एक्सयुव्ही कारचा भीषण अपघात झाला आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं कार नदीच्या पुलावरून खालीकोसळली. अपघातात दत्ता मेघे वैद्यकीय रूग्णालयातील सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचेभाजपचे आमदार विजय राहांगडाले यांचा एकुलता एक मुलगा अविष्कार राहांगडालेचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे

पहाटे दीड वाजता हा भीषण अपघात घडला. या मार्गावरील सेलसुरा येथील दुभाजकला धडकून एक्सयुव्ही गाडी पुलावरून खालीकोसळली. अपघात एवढा भीषण होता की, गाडीत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, गाडीतील सर्व साहित्याचा चेंदामेंदा झाला आहे. त्यावेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या ट्रक चालकास याबाबत माहिती मिळाली. त्यानं वर्ध्याकडेसलोडला येताना सावंगी पोलिसांना यासंदर्भातील माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.