मुंबई : पाकिस्तानातून समुद्रमार्गे भारतात आणले जाणाऱ्या ड्रग्जची मोठी खेप नौदलाने गुजरातनजीक पकडली. या पकडलेल्या ड्रग्जची किंमत तब्बल २ हजार कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे. नौदलाची आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कामगिरी असल्याचे म्हटले जात आहे.
एनसीबी गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड धडाकेबाज कारवाई करत आहे. एनसीबीकडून आतापर्यंत अनेक ठिकाणी धाडी टाकल्या गेल्या आहेत. तसेच अनेक ड्रग्ज तस्करांना अटकही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एनसीबीची ही कारवाई अजूनही तितक्याच जलद वेगाने सुरू आहे. भारताच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एसीबीने आज भारतीय नौदलाच्या मदतीने भर समुद्रात ही कारवाई केली.
समुद्रात अंमली पदार्थाने भरलेल्या एका जहाजाला सीझ करण्यात एनसीबी आणि भारतीय नौदलाला यश आले आहे. या जहाजातून तब्बल ८०० किलो अंमली पदार्थ मिळाले आहेत. त्यामध्ये चरस आणि हेरॉईनचा समावेश आहे. या अंमली पदार्थाची किंमत तब्बल २ हजार कोटी रुपये इतकी आहे. एनसीबीने आतापर्यंत केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. या कारवाईबाबत भारतीय नौदलाने स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे. भारतीय नौदल हे देशाला ड्रग्जमुक्तीसाठी योगदान देण्यास कटिबद्ध असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. एनसीबीने ड्रग्जविरोधात भर समुद्रात केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.