मुंबई : ६३ व्या तिबेटन उठाव दिवसाच्या औचित्याने १० मार्च रोजी या दिवसाचे स्मरण म्हणून मुंबई शहरातल्या तिबेटी समाज बांधवांनी तिबेट वाचवा “सेव्ह तिबेट” ही घोषणा घेऊन एका मोर्चाचे आयोजन केले होते.
त्याद्वारे त्यांनी चीनकडून तिबेटमधील नागरिकांवर केल्या जात असणाऱ्या अत्याचारांविरुद्ध सेव्ह तिबेट, तिबेटला स्वतंत्र करा, तिबेटला मुक्त करा, “free Tibet” “China stole our land” चीनने आमची जमीन चोरली; हडप केली, आमची जमीन परत द्या, “give our land back”च्या घोषणा दिल्या.
या मोर्चात सुमारे ४० तिबेटी नागरिकांनी सहभाग घेतला होता.