‘कायद्यापुढे सगळे समान, मग हा तमाशा का?’

0

मुंबई : पोलीस बदली घोटाळा प्रकरणाचा अहवाल लीक झाल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशी सुरु आहे. चौकशीसाठी बीकेसी सायबर पोलीस पथक फडणवीस यांच्या घरी पोहोचले आहे. फडणवीस यांच्या चौकशीविरोधात भाजप आज राज्यभर आंदोलन करणार आहे, केले आहे. यावरुन महाविकास आघाडीमधील मंत्र्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस केवळ माहिती घेणार आहेत, त्याचा इतका गोंधळ करायची काय गरज आहे ? ईडी, आयकर विभाग केंद्रीय तपास यंत्रणा यांचा वापर करता आणि इथं पोलिसांनी साधी माहिती घ्यायची नाही का ? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीवरुन सुरु असलेल्या गदारोळावरती शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राऊत ट्विट करत म्हणाले, कमाल आहे ! काही लोक व काही राजकीय पक्ष स्वत:ला कायद्यापेक्षा मोठे समजत आहेत ? महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनिधींना राजकीय सुडापोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले… लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का ?

कमाल आहे!
काही लोक व काही राजकीय पक्ष स्वता:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत?
महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनधींनीना राजकीय सुडा पोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले.. लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का?

— Sanjay Raut (@rautsanjay61) March 13, 2022

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या पेन ड्राईव्ह बॉम्ब नंतर महाराष्ट्रात राजकारण चांगलंच तापलं आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांना पोलिसांनी पाठवलेल्या नोटीस नंतर भाजप आक्रमक झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन केली जात आहेत. नाशिकच्या एन डी पटेल रोडवर भाजपच्या मुख्य कार्यालयाबाहेर आमदार देवयानी फरांदे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपने सरकारविरोधात जोरदार घोषणा बाजी केली. तसेच नोटीसीच्या प्रतिमेची होळी केली.
तर दुसरीकडे डोंबिवलीमध्ये भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.