कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा यांनी मुंडे करूणा धनजंय या नावे अपक्ष उमेदवारी अर्ज अखेरच्या दिवशी दाखल केलेला आहे. त्यांच्या उमेदवारी अर्जाबरोबर दाखल केलेया प्रतिज्ञापत्रात अनेक खुलासे सार्वजनिक झालेले आहेत.कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक जिंकण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीच्या उमेदवारा विरोधात नामसामर्ध्य असलेल्या एका महिलेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. मतदारांची गल्लत होण्याच्या दृष्टीने असे उमेदवारी अर्ज राजकीय पक्ष दबावातून दाखल करण्यास भाग पाडतात असा पूर्व इतिहास आहे. त्याचा किती विपरीत परिणाम होईल हे निकालावरून स्पष्ट होईलच. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक-2022 करिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज अखेरच्या दिवशी करूणा धनजंय मुंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्यासह 27 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये 19 उमेदवारांनी 27 अर्ज दाखल केले आहेत. प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी प्रत्येकी 4 व 2 असे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांमध्ये सत्यजित नाना कदम, आढाव जयश्री चंद्रकांत (नाना), अस्लम बादशाहजी सय्यद, बाजीराव सदाशिव नाईक, भोसले भरत संभाजी, चव्हाण सचिन प्रल्हाद, जाधव जयश्री चंद्रकांत (नाना), माने अरविंद भिवा, मनिषा मनोहर करंदे, मुंडे करुणा धनंजय, मुस्ताक अजिज मुल्ला, राजेश उर्फ बळवंत सत्यप्पा नाईक, राजेश सदाशिव कांबळे, संजय भिकाजी मागडे, संतोष गणपती बिसुरे, सीमा शाहिकांत कदम, शाहीद शहाजहान शेख, विजय शामरावकेसरकर, यशवंत कृष्णा शेळके यांचा समावेश आहे.
जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या नावे ८६ कोटी २३ लाख ३५ हजार रुपये किमतीची मालमत्ता
विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदार संघातून महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या नावे ८६ कोटी २३ लाख ३५ हजार रुपये किमतीची मालमत्ता आहे; तर २२ कोटी ६३ लाखांचे कर्ज आहे. चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या नावे असलेली सर्व स्थावर व जंगम मालमत्ता जयश्री यांच्या नावे झाली आहे. जाधव यांच्याकडे १ लाख ५५ हजार ६८० रुपयांची रोकड असून एक कोटी २३ लाख ४१ हजार ९६५ रुपयांच्या बँक ठेवी आहेत. त्यांची शेअर्समधील गुंतवणूक एक लाख ७९ हजार ५०० रुपयांची आहे; तर राष्ट्रीय बचत योजनेतील त्यांची गुंतवणूक २८ लाख ३६ हजारांची आहे. त्यांच्या वापरात असलेल्या दोन अलिशान कारसह उद्योग व्यवसायांत मिळून एकूण बारा वाहने आहेत. जाधव इंडस्ट्रीजसह अन्य कंपन्यांतील जाधव यांची गुंतवणूक ३१ कोटी ०४ लाख ९८ हजार ४१६ एवढी आहे. त्यांच्या नावावर असलेल्या सोन्याच्या दागिन्यांचे मूल्य ५७ लाख ३३ हजार ५८२ इतके आहे. निवासी इमारतीचे मूल्य ४ कोटी ६० लाख ०४ हजार एवढे आहे. जाधव यांच्या नावे ८६ कोटी २३ लाख ३५ हजार इतकी स्थावर व जंगम मालमत्ता असून २२ कोटी ६३ लाख २४ हजार २८ रुपयांचे कर्जदेखील आहे.
भाजपचे ‘कोल्हापूर उत्तर’चे उमेदवार सत्यजित कदम हे २१ कोटी रुपयांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचे मालक आहेत. त्यांनी उमेदवारी अर्जामध्ये आपल्या मालमत्तेचे विवरण दिले आहे. तर त्यांच्यावर टोल, हद्दवाढ आणि कोरोना काळात व्यापाऱ्यांच्या बाजूने केलेल्या आंदोलनामध्ये गुन्हे दाखल आहेत.कदम यांच्याकडे यांच्याकडे ४ लाख ३२ हजारांची रोकड असून, विविध बँकांमध्ये ६१ लाख १६ हजार रुपयांच्या ठेवी आहेत. त्यांनी विविध कंपन्यांचे समभाग आणि म्युच्युअल फंडामध्ये १० लाख ७५ हजारांची गुंतवणूक केली आहे. तसेच १ कोटी पाच लाख रुपये संस्था, कंपनी किंवा वैयक्तिक कर्ज म्हणून दिले असून, सव्वा पाच लाखांचे सोन्याचे दागिने त्यांच्याकडे आहेत. अशी सर्व गुंतवणूक २ कोटी ९८ लाख रुपयांची आहे.कदम यांच्याकडे शेती, भूखंड, फ्लॅट, इमारती, भागीदार असलेल्या कॅडसन फोटो कलर लॅब, कॅडसन डिझेल, केएम डेव्हलपर्स, केएम डेव्हलपर्स ॲण्ड बिल्डर्स या माध्यमातून १७ कोटी ५५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
करुणा शर्मा यांनी शिवशक्ती या नवीन पक्षाची घोषणा केली परंतु अद्याप मान्यता मिळालेली नाही अशी माहिती आहे. त्यामुळे त्यांना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला आहे. त्यांनी प्रतिज्ञापत्रात काय खुलासे केले आहेत. त्या कोणत्या मतदारसंघातील मतदार आहेत. काय नावाने मतदार यादीत नाव आहे, संपत्ती किती आहे. प्रतिज्ञापत्रातील सविस्तरपणे तपशील जाणून घेण्यासाठी सशुल्क माहिती प्राब कडे उपलब्ध होईल. खालील लिंकवर क्लिक करा (ऐच्छिक स्वरुपात)
https://www.instamojo.com/@bhujbalchandrakant/
करुणा मुंडे यांनी प्रतिज्ञापत्रात मतदारसंघाचा क्र. नाव व तपशील दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी 177 वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ यादी भाग क्र. 23 मधील अनुक्रमांक 781 असा नमूद केलेला आहे मात्र सदरील यादी भागात या क्रमांकाचे नाव आहे कि नाही? त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध/वैध ठरणार का? या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतील.