राणा दाम्पत्याची रवानगी कारागृहात

0

मुंबई : राणा दाम्पत्याला मोठा धक्का बसला असून वांद्रे न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मुंबईत येणं राणा दाम्पत्याच्या चागलंच अंगाशी आलं आहे.

न्यायलयात राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यावर त्यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी यांनी जामिनासाठी अर्ज केला. मात्र वांद्रे न्यायालयाने तातडीने जामिन अर्जावर सुनावणी घेण्यास नकार दिला. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर 29 एप्रिलला सुनावणी होणार असून नवनीत राणा भायखळा येथे महिलांच्या कोठडीमध्ये राहणार आहेत.

राणा दाम्पत्याला असं करण्यासाठी कोणी उद्युत्त केलं?, त्यामागे कोणाचा हात होता याचा तपास करण्यासाठी सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली होती. यावर राणांच्या वकिलांनी हे आरोप चुकीचे असल्याचं सांगत विरोध केला. त्यानंतर न्यायदंडाधिकारी ए. ए. धानीवाले यांनी राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

दरम्यान, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर हनुमान चालिसा पठणासाठी मुंबईत आल्या होत्या. मात्र शनिवारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने केलीत. त्यानंतर दुपारी राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली होती.

राणा दाम्पत्याला रात्रभर सांताक्रुझ पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं. त्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर केलं गेलं.

Leave A Reply

Your email address will not be published.