तेलंगणा ठरले पत्रकारांना कल्याणकारी योजना जाहीर करणारे पहिले राज्य

0

हैद्राबाद : तेलंगणा राज्य हे आपल्या राज्यातील पत्रकारांना मान्यता देणारे पहिले राज्य ठरले आहे. सरकारने राज्यातील १८०००पत्रकारांना मान्यता दिली आहे. या योजनेतून पत्रकारांना फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

तेलंगणा राज्यात सध्या तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाची सत्ता असून के. चंद्रशेखर हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. राज्यातील अठराहजार पत्रकारांसाठी सरकारने १०० कोटी रुपये जाहीर केले आहेत. तसेच हा निधी सरकार पत्रकारांच्या कल्याणासाठी वापरणारअसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तेलंगणा राष्ट्र समितीच्या आमदार के. कविथा यांनी याबद्दल माहिती देताना सांगितलं.

तसेच या योजनेतून पत्रकारांचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना लाख रुपये मिळणार आहेत. तसेच नातेवाईकांना वर्षासाठीपेन्शन म्हणून तीन हजार रुपये दिले जातील असं आमदार के, कविथा यांनी स्पष्ट केलं आहे. या योजनेनंतर राज्यातील अठरा हजारपत्रकारांना या योजनेचा फायदा होणार आहे.

तेलंगणा सरकार हे पत्रकारांच्या कल्याणाबाबत खूप सतर्क आहे. कोरोनासाथीच्या काळामध्ये राज्यातील ६४ पत्रकारांचा मृत्यू झालात्यावेळी त्यांच्या कुटुंबियांना राज्याने लाखांची मदत केली आहे. सरकारने जाहीर केलेल्या मदतनिधीपैकी ४२ कोटींचा निधीआत्तापर्यंत खर्च झाला असल्याची माहिती आमदार के. कविथा यांनी दिली. जर एखाद्या पत्रकाराचे निधन झाले आणि त्याला मुलेअसतील, तर ते पदवीधर होईपर्यंत प्रत्येक मुलासाठी 1,000 रुपये सरकारकडून दिले जातील, त्यांच्या अभ्यासात अडथळा येऊ नयेअशी आमची इच्छा आहे असं कविथा यांनी सांगितलं. त्याचबरोबर पत्रकाराचा अपघात झाल्यास ५०,००० रुपयांची मदत तेलंगणासरकार देणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.