कराची : पाकिस्तानचे कराची शहरात काल रात्री उशीरा झालेल्या बाॅम्बस्फोटात तीन ठार तर 13 हून अधिक जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, काल रात्री उशीरा कराचीमध्ये बाॅंम्बस्फोट झाला. हा स्फोट इतका तीव्र होता की त्याचा आवाज दूरपर्यंत गेला. या स्फोटामुळे आजूबाजूची वाहने सुद्धा उद्धवस्त झाली. या अचानक झालेल्या हल्ल्याने कराची बाजारपेठेत एकच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
या बाॅम्बस्फोटात तीन लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तेरा पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर आजूबाजूचा परिसर उद्धवस्त झाला असून यामध्ये वाहनांचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, हा बाॅम्ब कचराकुंडी शेजारी उभी असणाऱ्या सायकलमध्ये ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे. या बाॅम्बस्फोटात दोन किलो स्फोटके आणि सुमारे अर्धा किलो बॉल बेअरिंगचा वापर केल्याचे सांगण्यात येत आहे. शहराच्या डाऊनटाऊनमध्ये हा स्फोट झाला असून हाॅटेल आणि घरांच्या काचा फुटून खूप मोठे नुकसान झाले आहे.
या हल्ल्याची जबाबदारी सिंध आणि बलुचिस्तानच्या फुटीरतावादी गटांनी स्विकारली असून कराची पोलिसांकडून दहशतवादी हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे.