मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. दैनंदिन रुग्ण संख्या वाढत असताना जागतिक आरोग्य संघटनेनं महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्याची सर्वांना भीती होती तेच घडलंय. कोरोनाची चौथी लट सुरु झाल्याचं WHO नं म्हटलंय. कोरोनाच्या नव्या छोट्या लाटेला सुरुवात झाल्याचा जागतिक आरोग्य संघटनेनं इशारा दिला आहे.
ओमायक्रॉनचा सब व्हेरियंट वेगानं पसरतोय, असेही WHO नं नमूद केलं आहे. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात BA.4 आणि BA.5 व्हेरियंट वेगानं पसरतोय, असा इशारा WHO च्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी दिलाय. हीच चौथ्या लाटेची सुरुवात आहे. दर चार ते सहा महिन्यांनी कोरोनाच्या लहान लाटा येतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, राज्यात जूनच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. तसेच सर्वाधिक रुग्णांची नोंद मुंबईत होत आहे. शुक्रवारच्या आकडेवारीनुसार राज्यात सक्रिय रुग्णांचा आकडा 13 हजार पार गेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह अधिकारी वर्ग आणि प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पाश्वभूमीवर राज्य सरकार लवकरच काही निर्बंध लागू करु शकते.
राज्यातील दैनंदिन आकडेवारी
1 जून – 1081
2 जून – 1045
3 जून- 1134
4 जून – 1357
5 जून – 1494
6 जून – 1036
7 जून – 1881
8 जून – 2701
9 जून – 2813
10 जून – 3081