नवी दिल्ली : उद्याच्या आषाढी एकादशीनंतर मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईत बसून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा करू. त्यानंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, अशी माहिती शिवसेनेचे बंडखोर नेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजधानी नवी दिल्लीत दिली. त्यांच्यासह देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत आहेत. या दोन्ही नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या नेत्यांसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेतली होती. या भेटीगाठीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
ते म्हणाले, आषाधी एकादशी उद्या आहे, त्यानंतर मंत्रिमंडळ निश्चित केले जाईल व अधिवेशनाआधी मंत्र्यांचा शपथविधी होईल. राज्यात एका विचारातून शपथविधी घडला आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर या सदिच्छा भेटी होत्या. पंतप्रधानांसह सर्वांनी राज्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. आमंचं बंड नव्हे, आमची पक्षातील क्रांती आहे. बंड केलेले आमदार पैशांच्य मागे आलेले नाहीत. ५० खोके कसले? मिठाईचे का? या शब्दांत पैसे घेतल्याच्या आरापोला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. सभागृहात तोंड दाबून मुक्क्यांचा मार खात होतो. सभागृहात सावरकरांविषयी बोलू शकत नव्हतो, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आपले सरकार अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असेही ते म्हणाले.