पुणे : कामशेत ते खांडशी या मार्गावरील वडिवळे पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे आठ गावांचा संपर्क तुटला आहे. दरवर्षी पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जातो आणि गावांचा किमान आठवडाभरासाठी संपर्क तुटतो. दरवर्षी ही परिस्थिती उदभवत असताना देखील प्रशासन आणि राजकीय नेते याकडे कधीच लक्ष देत नाहीत, यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मावळ तालुक्यातील कामशेत ते खांडशी हा आठ गावांना जोडणारा एकमेव रस्त्यावरीवरील पुल आहे. मात्र त्यातील कशाचाच परिणाम सत्ताधाऱ्यांवर होताना दिसत नाही. “आम्हाला पावसाळ्यात हा पूल बंद झाला की दुसरा कुठलाही मार्ग उरत नाही. आम्ही दरवर्षी ५ ते ६ दिवस आमच्या गावात अडकलेलो असतो,”
स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होत आली असली आणि अनेक वेगवेगळी सरकारेही येऊन गेली असली, तरी महाराष्ट्रातल्या मावळ तालुक्यातील वडिवळे पुलाकडे त्यांची दयाशील नजर गेलेली नाही. एकीकडे श्रीमंती आणि विकास मिरवणारा महाराष्ट्र, महाराष्ट्रातील या भागाला ज्या प्रकारच्या हलगर्जीपणातून वागवतो ते पाहून हे लक्षात येते की हा विकास किती असमान झाला आहे. असा नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.