कोल्हापूर : रात्री पार्टी करून घरी आलेल्या डॉक्टर तरुणीने घरी काहीही न सांगता पुन्हा घराबाहेर पडत इंजेक्शन टोचून आत्महत्या केली. त्यामुळे तिच्या कुटुंबासह सहकाऱ्यांनाही धक्का बसला आहे.
अपूर्वा प्रवीणचंद्र हेंद्रे (30) असे कोल्हापूर येथे राहणाऱ्या या तरुणीचे नाव आहे. तिचे आई वडीलही डॉक्टर आहेत. येथील खासगी रुग्णालयात ती प्रॅक्टिस करत होती.
दरम्यान शहरातील ताराबाई पार्क परिसरात तिचा मृतदेह आढळून शनिवारी रात्री पोलिसांना मिळाला. तिचे आत्महत्या करण्याचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.
शनिवारी मध्यरात्री ही तरुणी पार्टी करून घरी परतली आणि पुनः बाहेर पडली. त्यानंतर ती घरी न आल्याने तिच्या शाहूपुरी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी शोध घेतला असता पहाटे तिचा मृतदेह ताराराणी पार्क या उच्चभ्रू परिसरात आढळून आला.