धक्कादायक…राज्यात 23 दिवसांमध्ये 89 शेतकऱ्यांनी आत्महत्या

0

मुंबई : शिंदे गट आणि भाजपने एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यात कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा संकल्प जाहीर केला होता.

मात्र गेल्या 23 दिवसांमध्ये राज्यात 89 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर अजूनही 24 दिवस उलटले तरीही राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे राज्याला अजूनही कोणत्याही खात्याला मंत्री मिळालेले नाही. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा संकल्प जाहीर करूनही राज्याला 24 दिवसांत कृषिमंत्री मिळाले नाही.

मागील 23 दिवसांमध्ये राज्यात 89 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. औरंगाबाद, बीड, यवतमाळमध्ये सर्वाधिक आत्महत्या केल्याची वृत दिव्य मराठीने दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अनेक घोषणा केल्या आहे. आतापर्यंत शिंदे आणि फडणवीस यांनी तीनवेळा मंत्रिमंडळाच्या बैठका घेतल्यात.

या बैठकांमध्ये शहरांचं नामांतर, थेट सरपंच निवडणूक, आरे कारशेड, एमएमआरडीएच्या कर्जाची घोषणा केली आहे, पण अजूनही शेतकऱ्यांना दिलासा देणारी कोणताही घोषणा सरकारने केली नाही. राज्यात आधीच अस्मानी संकट आले असताना कृषि खात्याचा कारभार अजूनही वाऱ्यावरच आहे. (यशाचा राजमार्ग! व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा यशासाठी आवश्यक असणाऱ्या 5 गोष्टी) राज्य सरकारने आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये बळीराजा चेतना अभियान, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन स्थापन केले.

पण या दोन्ही योजना मंत्रालयातच अडकलेल्या आहे. 1 जानेवारी ते जून या 6 महिन्या मराठवाड्यात 306 आणि विदर्भामध्ये 368 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे, यावेळी एकनाथ शिंदे हे त्या सरकारमध्येच होते. एवढंच नाहीतर कृषिमंत्री सुद्धा शिंदे गटात असलेले दादा भुसे हेच होते. (विश्वस्तच मंदिराचा कळस कापून नेतात..’; लोकशाहीची ‘मंदिरे’ भ्रष्ट झाल्याचा आरोप) मागील 23 दिवसांमध्ये सर्वाधिक आत्महत्या या औरंगाबाद जिल्ह्यात केल्या आहेत. त्यापाठोपाठ बीडमध्ये 13 आणि यवतमाळमध्ये 12 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. परभणी 6, जळगाव 6, जालना 5, बुलडाणा 5, उस्मानाबाद 5, अमरावती 4, वाशिम 4, अकोला 3, नांदेड 2 आणि भंडारा-चंद्रपूरमध्ये 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात.

Leave A Reply

Your email address will not be published.