राज्यपालांना कोल्हापुरी जोडा दाखवा ; उद्धव ठाकरेंची जहरी टीका

0

मुंबई :”मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकं निघून गेल्यास पैसाच उरणार नाही, मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं वक्तव्य करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नवा वाद ओढवून घेतला होता. कोश्यारींच्या वक्तव्यावर चौफेर टीका सुरू झाली आहे. 

“राजपाल हे मानाचं पद आहे. राजपालपदाचा मी अपमान करु इच्छित नाही. कोश्यारींनी राज्यपालांच्या खुर्चीचा मान ठेवलेला नाही. महाराष्ट्राच्या नशिबी अशी माणसं का येतात,”असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत उपस्थित होते.

“महाराष्ट्राला गड-किल्ले, खाद्य पदार्थ, पैठणी अशी विविध संस्कृती आहे. राज्यपालांनी या सगळ्याचा अनुभव घेतला आहे. त्यांनी कोल्हापुरी जोडा पाहिलेला नाही. राज्यपालांना कोल्हापुरी जोडा दाखविण्याची गरज आहे,” असा हल्लाबोल ठाकरेंना आज केला.

ठाकरे म्हणाले, “कोरोना काळात राज्यपालांना धर्मस्थळ उघडण्याची घाई झाली होती.त्यांच्या पत्राला मी उत्तर दिले नाही. तेव्हा मी मुख्यमंत्री असल्यामुळे फार बोललो नाही. पण गेल्या तीन वर्षात त्यांनी अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत. त्यांनी महाराष्ट्रात राहूनच महाराष्ट्राचा अपमान केला आहे. ते सातत्याने वादग्रस्त विधान करीत आहेत,”

“राज्यपालांनी केलेल्या विधानामुळे परप्रातींयामध्येही नाराजी आहे. मराठी माणसं सध्या चिडलेली आहे. अशा परिस्थितीत कोश्यारी असे विधान करीत आहेत. त्यांना मुंबई आंदण दिलेली नाही. त्यांचं स्क्रिट दिल्लीतून येते, त्यांना हे विधान करुन मराठी माणसामध्ये आग लावली आहे. मराठी माणसांनी रक्त सांडून मुंबई मिळवली आहे. त्यांच्या अशा विधानामुळे त्यांना घरी पाठवायचे की तरुंगात पाठवावे हे ठरविण्याची वेळ आली आहे. हिंदुमध्ये फूट पाडण्याची नीच काम त्यांनी केले आहे,” अशी जहरी टीका ठाकरेंना यावेळी केली.

“त्यांनी महात्मा फुले यांचाही अपमान केला होता. आज तो ज्यांनी कहर केला आहे. हे विधान अनावधानाने आलेले विधान नाही. मागच्या काही दिवसांपासून सगळे वरती आले आहे. त्यांची भाषण कोण लिहुन देत माहित नाही. त्यांची भाषण कोण लिहून देत माहित नाही. त्यांच्या ओठावरचे वक्तव्य हे कुणाच्या पोटातून आले हे माहिती नाही,”असे ठाकरे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.