राज्यात दिड वर्षात 11 हजार 751 बालमृत्यू

0

मुंबई : मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक जिल्ह्यांत अधिक बालमृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. सिंधुदुर्गमध्ये सर्वांत कमी बालमृत्यू नोंद झाली आहे.  मागच्या दीड वर्षात राज्यभरात 11 हजार 751 बालमृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी 19 हजार 663 अर्भकांचा मृत्यू झाला आहे. तर 3 हजार 78 बालमृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात महत्त्वाच्या पाच शहरात बालमृत्यूचं प्रमाण अधिक असल्याने चिंतेचं वातावरण आहे. विशेष म्हणजे अत्यंत कमी बालमृत्यूची नोंद सिंधूदुर्ग जिल्ह्यामध्ये झाली आहे. शासनाकडून महिला आणि बाल आरोग्य सुधारावे यासाठी विविध योजना राबविल्या जातात. तसेच या योजनांवर दरवर्षी कोट्यवधींचा खर्च होत असतो. तरीही बालमृत्यू होत असल्याने चिंतेचा विषय झालेला आहे.

राज्यातील काही जिल्ह्यातील बालमृत्यूची आकडेवारी

नागपूरमध्ये – 1 हजार 741,

औरंगाबाद – 1 हजार 349,

नाशिक – 1 हजार 127,

पुणे – 1 हजार 181

अकोला – 1 हजार 94

नंदुरबार – 1 हजार 26

ठाणे – 1 हजार 15

मागच्या 17 महिन्यात 0 ते 5 वयोगटातील ही आकडेवारी मिळाली आहे. यामध्ये सर्वात जास्त बालमृत्यू मुंबई आणि मुंबई उपनगरात झाले असून ते 1 हजार 898 आहेत. त्यामुळे सगळ्या अधिक बालमृत्यू हे मुंबई आणि मुंबई उपनगरात झाले आहेत. नंदुरबार व अकोला हे जिल्हे वगळल्यास उर्वरित जिल्हे प्रगत आहेत आहेत. या जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण 43 टक्के आहे. बालकांच्या पोषणासाठी राज्य शासन विविध योजना राबवित असते. पण त्याचा परिणाम कोणत्याही शहरात होत असल्याचे दिसून येत नाही. पण दुसऱ्या बाजूला कोकणातील सिंधुदुर्गमध्ये सर्वात कमी 64 व मराठवाड्यातील वाशिम 89, लातूरमध्ये 125 बालमृत्यू झाले आहेत. राज्याचा विचार केल्यास राज्यात भविष्यात बालमृत्यू रोखण्यासाठी चांगल्या उपाय योजना करणं गरजेचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.