पूरग्रस्तांसाठी हेक्टरी १३,६०० रुपये मदत जाहीर

0

मुंबई : राज्यातील पूरग्रस्तांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पूरग्रस्तांना आता हेक्टरी १३,६०० रुपये मदत मिळणार आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. यामध्ये १५ लाख हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान होऊ शकतं किंबहुना आत्तापर्यंत आलेल्या १५ लाख हेक्टर शेतीच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शिवेसना-भाजप युतीनं विशेष बाब म्हणजे आत्तापर्यंत कधीही नुकसान भरपाई मिळाली नव्हती तेवढी म्हणजे एनडीआरएफच्या नियमांप्रमाणं जेवढी मदत दिली जात होती त्यापेक्षा दुप्पट मदत देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

त्याचबरोबर दोन हेक्टरची मर्यादा वाढवून ती तीन हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळं अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. एनडीआरएफच्या नियमानुसार ६,८०० रुपये मिळत होते. त्यापेक्षा दुप्पट म्हणजे १३,६०० रुपये प्रति हेक्टर इतकी मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.