पिंपरी : कझाकिस्थान देशात झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलातील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांनी ‘आयर्नमॅन’ हा किताब पटकवला आहे.
पोलीस खात्यात असणारे दैनंदिन कामकाज, बंदोबस्त हे सर्व पाहून ते स्वतः साठी वेळ देऊन नियमीत सराव करत होते. धावणे, सायकल चालवणे आणि पोहणे याचसोबत ‘जिम’ असा त्यांचा व्यायाम हा नेहमीच सुरु आहे.
कझाकिस्थान येथे नुकत्याच झालेल्या स्पर्धेत राम गोमारे यांनी भाग घेतला होता. यामध्ये 3.8 किलो मीटर पोहणे, 180 किलो मीटर सायकल चालवणे आणि 42 किलोमीटर धावणे हे नियम होते. हे तिन्ही प्रकार सलग जास्तीत जास्त 16 तास 30 मिनिटात पार करणे हा नियम होता.
राम गोमारे यांनी त्यांच्या सरावाच्या ताकतीवर हे ‘टार्गेट’ अवघ्या 11 तास 50 मिनिटात पार करुन ‘आयर्नमॅन’चा किताब पटकवला आहे. गोमारे हे सध्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील हिंजवडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्याच्या या कामगिरीबद्दल पोलीस खात्यातून त्यांचे कौतुक केले जात आहे.
राम गोमारे यांच्या सोबत पिंपरी चिंचवड शहरातील उद्योजक सचिन वाकडकर यांनीही ‘कझाकिस्थानआयर्नमॅन’चा’ किताब 13 तास 54 मिनिटात पटाकवला आहे. तसेच पांडुरंग बोडके यांनीही ‘कझाकिस्थानआयर्नमॅन’चा’ बहुमान मिळवला आहे.