सोनाली फोगाट मृत्यू प्रकरण : मादक पदार्थ खायला देऊन बलात्कार करुन ब्लॅकमेल केल्याचा आरोप

0

हरियाणा : हरियाणातील भाजप नेत्या सोनाली फोगाटच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणात आता त्यांच्यावर बलात्कार झाल्याचा आणि त्यांना ब्लॅकमेल केले जात होते असे आरोप लावण्यात आले आहेत. सोनालीचा लहान भाऊ रिंकू ढाका, जे हरियाणातील फतेहाबाद जिल्ह्यातील भूथनकला गावात राहतात. त्यांनी आपल्या बहिणीचा पीए सुधीर संगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर यांच्यावर सोनालीला तिच्या जेवणात मादक पदार्थ देऊन बलात्कार केल्याचा आणि व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे.

यासोबतच सोनालीची मालमत्ता हिसकावून राजकीय षडयंत्र रचून तिची हत्या केल्याचेही म्हटले आहे. या संदर्भात रिंकूने गोवा पोलिसांकडे लेखी तक्रार दिली असून कारवाईची मागणी केली आहे. भूथनकला हे सोनालीचे वडिलोपार्जित गाव आहे. सोनालीचे आई-वडील, भाऊ आणि वहिनी दोघेही याच गावात राहतात.

दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, सोनाली फोगटच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलीस सखोल तपास करत आहेत. गोव्याचे डीजीपी स्वत: या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.