औरंगाबाद : शिंदे गटाचे 15 आमदार मातोश्रींच्या संपर्कात आहेत. ते मूळचे शिवसेनेचे आहेत. त्यांना आता दुखः होत आहे. ते शिवसेनेते दाखल होतील, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
संदीपान भुमरे यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली. शिवसेनेतून आमच्याकडे आणखी आमदार येतील अशी शक्यता भुमरेंनी व्यक्त केली होती. आता शिवसेनेत केवळ दोनच आमदार असतील असेही ते म्हणाले. यावर चंद्रकांत खैरे यांनी आपल्या शैलीत चांगलाच समाचार घेतला.
चंद्रकांत खैरे म्हणाले, आमच्या संपर्कात आपल्याला उद्धव ठाकरेंनी मोठे केले. शिवसेनेने मोठे केले. त्यांना शिवसेना सोडल्याचा पश्चाताप होत आहेत. सरकार पडणार हे त्यांनाही माहित आहे. या सोळा लोकांचे काहीही होऊ शकते. त्यामुळे सरकार पडणार हे त्यांनाही माहित आहे.
खैरे म्हणाले, आपण केवळ पन्नास आहोत आणि भाजपचे एकशे सोळा लोक आहेत. अजूनही भाजप तोडफोड करून आमदार घेऊन जातील याची भीती शिंदे गटातील आमदारांना वाटत आहे. शिंदे गटात गेलेले आमदार आजही शिवसेनेशी आदर बाळगून आहेत. आमच्या जिल्ह्याचे संपर्कात नाहीत, पण एक आमदार शिवसेनेत कट्टर होते. ते स्वतः आज नाराज आहेत. ते कुठल्याही दबावाखाली येत नाही, असे अनेक जण आहेत. शिवसेनेबद्दल मन साफ आहेत, असे अनेक आमदार आहेत जे आमच्या संपर्कात आहेत. खैरे म्हणाले, भुमरेंना मंत्रिपद काय समजत नाही. कुठल्या तरी गावठी सभेत पंचवीस लोकांच्या सभेत त्यांनी शिवसेनेचे दोन आमदार संपर्कात असल्याचे ते सांगतात.