2002 च्या गुजरात दंगलीशी संबंधित नऊ खटले बंद

0

गुजरात : 2002 च्या गुजरात दंगलीशी संबंधित नऊ खटले बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सरन्यायाधीश यू. यू. लळित, न्यायमूर्ती एस. रवींद्र भट व न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठाने सांगितले की, आता या याचिकांवर विचार करण्याची गरज नाही. मात्र, नरोडा गावातील दंगलीशी संबंधित खटला बंद केलेला नाही.

हे प्रकरण कनिष्ठ न्यायालयात सुरू आहे. सरन्यायाधीश लळित म्हणाले, 10 याचिकांच्या मागणीवरून 9 प्रकरणांच्या चौकशीसाठी तपास पथक स्थापन केले होते. यापैकी 8 प्रकरणांचा तपास व सुनावणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणांशी संबंधित तिस्ता सेटलवाड यांना संरक्षण देण्याची मागणी करणारी याचिका प्रलंबित आहे, असे वकील अर्पणा भट यांनी सांगितले. त्यावर सेटलवाड यांना अर्ज करण्याची मुभा दिली.

1992 च्या बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकार आणि इतरांविरुद्ध अवमानना कारवाई बंद केली. न्यायमूर्ती एस.के. कौल यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने घटनापीठाच्या नोव्हेंबर 2019 च्या निकालाचा संदर्भ देत म्हटले की, हे प्रकरण आधी सुनावणीसाठी आणायला हवे होते.

Leave A Reply

Your email address will not be published.