ब्रिटन : राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर सोमवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्वात शेवटी खासगी अंत्यसंस्काराचे विधी (कौटुंबिक अंत्यसंस्कार) पार पडले. तत्पूर्वी, स्टेट फ्यूनरल म्हणजेच शासकीय इतमामात अंत्यविधी पूर्ण केले गेले. दोन्ही विधी एकूण 9 तास चालले.
वेस्टमिन्स्टर अॅबे ते विंडसर कॅसल हा प्रवास सुमारे 40 किलोमीटरचा होता. यादरम्यान राजघराणे कधी पायी, तर कधी वाहनातून होते. विंडसर कॅसल येथे तीन प्रार्थना झाल्या. हेड ऑफ द स्टेट यांनी स्टेट फ्यूनरल कार्यक्रमात महाराणीला श्रद्धांजली वाहिली. यात अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख आणि राजघराण्यांची उपस्थिती होती. ‘द डेली मेल’च्या वृत्तानुसार, कॉफिन पाहण्यासाठी सोमवारी लंडनच्या रस्त्यांवर 20 लाख लोक उपस्थित होते.
ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर सोमवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. राजघराण्याच्या अधिकृत वेबसाइटने एका निवेदनात म्हटले की, राणीला किंग जॉर्ज मेमोरियल VI चॅपल येथे पती प्रिन्स फिलिप यांच्या शेजारी दफन करण्यात आले आहे.
राणीचे वडील किंग जॉर्ज सहावे यांच्याशिवाय आई आणि बहिण यांनाही येथे दफन करण्यात आले आहे. शेवटच्या समारंभाबद्दल कोणतेही फोटो- व्हिडिओ जाहीर करण्यात आले नाही. बकिंगहॅम पॅलेसने याला ‘ अत्यंत वैयक्तिक कौटुंबिक प्रसंग’ असे म्हंटले आहे. त्यामुळे त्याचे व्हिडिओ किंवा फोटोही प्रसिद्ध झाले नाहीत.
तत्पू्र्वी, स्टेट फ्यूनरल फंक्शनमध्ये विविध राष्ट्रप्रमुखांनी राणीला श्रद्धांजली वाहिली. यात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा समावेश होता. शाही कुटुंबाचा दर्जा सोडणारे किंग चार्ल्स यांचे सुपुत्र प्रिन्स हॅरी यांनी एलिझाबेथ यांच्या शवपेटीला सॅल्यूट केला नाही. याची चर्चा रंगली आहे.