बीड :गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे सध्या चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मोदींबद्दल एक वक्तव्य केलं होतं. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवलं तरीही मला संपू शकत नाहीत जर मी तुमच्या मनात असेल तर असं म्हणत पंकजा मुंडे यांनी थेट मोदींना आव्हान दिले आहे.
त्याशिवाय मी बेरोजगार असल्याचंही त्या काही दिवसांपूर्वी म्हणाल्या होत्या. या सर्वात आता पंकजा मुंडे यांच्या दसऱ्याच्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळाव्याचं टीझर प्रदर्शित झालं होतं. आता पंकजा मुंडेंचं गाव सावरगाव येथील दसऱ्या मेळाव्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
‘प्रचंड विश्वास..प्रचंड साहस..प्रचंड परंपरा.. सावरगाव दसरा..’ असं त्यांनी व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे.
वादग्रस्त वक्त्यावरून झालेल्या ट्रोलिंगबाबत बोलताना त्या म्हणाल्या, की ‘मी तुझ्याबद्दल अफवा पसरवतो, तू माझ्याबद्दल अफवा पसरव. मी तुला ट्रोल करतो, तू मला ट्रोल कर.
हे सोशल मीडियाचं युद्ध आहे’. ‘जुन्या काळातलं युद्ध वेगळं होतं. नव्या काळातलं युद्ध वेगळं आहे. साहेबांच्या वेळचे नेते वेगळे होते, परिस्थिती वेगळी होती, कार्यकर्ते वेगळे होते.
आत्ताचं युद्ध वेगळं आहे. हे युद्ध सोशल मीडियावर लढलं जातं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.