उत्तर प्रदेशात पावसाचा हाहाकार; १२ जणांना मृत्यू, शाळांना सुट्टी

0

उत्तर प्रदेश : ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातील पावसाने दिल्लीसह उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांना झोडपून काढले आहे. सतत कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या दुर्घटनेत उत्तर प्रदेश येथील १२ जण आणि उत्तराखंडमधील एकाचा असे एकूण १३ जणांना मृत्यू झाला आहे.

तर काही ठिकाणीच्या घरांची पडझड, झाडे कोसळणे आणि रस्ते उखडणे यासारख्या अनेक घटना घडल्या आहेत. तर याच दरम्यान उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांतील शाळा बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आला आहे.

लखनौचे जिल्हाधिकारी सुर्यपाल गंगवार यांनी सतत कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे एक आदेश जारी करत १२ वी पर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. यात त्यांनी मंगळवारी (११ ऑक्टोबर) रोजी शहरी, ग्रामीण भागातील सरकारी आणि खासगी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच जिल्हातील प्रत्येक शाळांना याबाबतचे आदेश देण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.