‘कमांडोज हाफ मॅरेथॉन’च्या मुख्य आयोजकाची आत्महत्या

0

कोल्हापूर : लाखो रुपये बक्षिसांचे आमिष दाखवून मॅरेथॉन च्या माध्यमातून नोंदणी शुल्क घेऊन गायब झालेला “कमांडोज हाफ मॅरेथॉन स्पर्धे”चा मुख्य आयोजक वैभव पाटील (४५, रा. तिरपण, ता. पन्हाळा) यांनी रविवारी पहाटे तिरपण गावी शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान, मॅरेथॉन मध्ये फसवणूक झालेल्या स्पर्धकांनी शनिवारी रात्री उशिरा त्याच्या विरोधात फसवणूक केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्याच्या आत्महत्यामुळे खळबळ माजली आहे.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यासह कर्नाटक दिल्ली हरियाणा पंजाब पश्चिम बंगाल आदी राज्यातून स्पर्धकांनी या कमांडोज हाफ मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यासाठी विविध गटानुसार ६०० ते १८०० रुपये पर्यंतचे नोंदणी शुल्क आकारणी केली होती. या स्पर्धेसाठी शनिवारी सायंकाळपर्यंत स्पर्धक कोल्हापुरात दाखल झाले होते. पण स्पर्धेचा मुख्य आयोजक वैभव पाटील हा अचानक गायब झाल्याने खेळाडूत खळबळ माजली होती. अनेक खेळाडूंनी फसवणूक झाल्याने एमसीएसएफ वेल्फेअर फाउंडेशनच्या न्यू शाहुपुरी येथील बेकार गल्लीतील कार्यालयाकडे धाव घेतली होती. त्या कार्यालयास टाळे आढळल्याने खेळाडूंनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात वैभव पाटील यांच्यावर फसवणुकीची तक्रार शनिवारी रात्री उशिरा दिली होती.

दरम्यान मुख्य आयोजक वैभव पाटील यांनीच तिरपण येथे गळफास लावून आत्महत्या केल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. त्याने आत्महत्या का केली? त्याने मॅरेथॉनच्या माध्यमातून खेळाडूंकडून जमा केलेले रकमेचा कोठे केला? याबाबत पोलीस माहिती घेत आहेत. वैभव पाटील यांच्या आत्महत्येची पन्हाळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.