गुजरात विधानसभा निवडणूका दोन टप्प्यात

0

गुजरात : २५ वर्षांपासून भाजपाची सत्ता असलेल्या गुजरातच्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत आज घोषणा करण्यात आली आहे. ही निवडणुक दोन टप्प्यात होणार आहे.

आयोजित पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली.

निवडणुक आयोगाने आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी मोरबी पुल दुर्घटनेत मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी गुजरात निवडणूकसंदर्भात भाष्य केलं. गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत आज घोषणा करण्यात आली आहे. ही निवडणुक दोन टप्प्यात होणार आहे. १ आणि ५ डिसेंबरला गुजरात निवडणुक पार पडणार आहे. तर ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

पहिल्या टप्यात ८९ मतदान पार पडणार आहे. तर दुसऱ्या टप्यात ९३ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. एकूण १८२ जागांवर निवडणूक होणार आहे.

गुजरातमध्ये ४.९ करोड मतदान होणार आहे. महिलांसाठी १२७४ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. तर दिव्यांगासांठी खास १८२ मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. तसेच, 80 वर्षांवरील मतदारांसाठी घरपोच मतदानाची सुविधा उपलब्ध असेल. अशा मतदाराला मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाचे एक पथक त्याच्याकडे जातील आणि त्याला अधिकार बजावण्याचा मार्ग उपलब्ध करुन देतील. असेही निवडणूक आयोगाने माहिती दिली.

हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत एकत्र घोषणा होईल असे सर्वांना वाटत होते पण तसे झाले नाही. त्यावेळी निवडणूक आयोगाने गुजरात निवडणुकीबाबत कोणतेही भाष्य केले नव्हते. आतापर्यंत गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुका या एकत्रच झाल्या होत्या.

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये आतापर्यंत 1998, 2007 आणि 2012 मध्ये एकाच वेळी विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. यावेळी निवडणूक आयोगाने एकत्र घोषणा न केल्यामुळे निवडणूक आयोगावर विरोधक टीका करत होते. दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये एकाच टप्प्यात 12 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

गुजरातमध्ये गेल्या 24 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. मात्र यावेळीच्या निडणुकीत जरा समीरणे बदलण्याची शक्यत आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये विजयी झाल्यानंतर गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने चांगलीच ताकद लावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.