भाजपा आमदारला ‘सेक्स्टॉर्शन’च्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न

0

कर्नाटक : भाजप आमदार टीप्पा रेड्डी यांना सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात ओढण्यासाठी प्रयत्न होत असल्याची तक्रार स्वतः रेड्डी यांनी कर्नाटक पोलिसांकडे नोंदवली आहे.

७२ वर्षीय भाजप आमदार रेड्डी यांनी सोमवारी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. आपल्याला कोणीतरी सेक्स व्हिडीओमध्ये अडकवून बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे रेड्डी यांनी म्हंटले आहे. IANS च्या माहितीनुसार, रेड्डी यांना ३१ ऑक्टोबर रोजी एका तरुणीचा कॉल आला होता, या व्हिडीओ कॉलमध्ये तरुणी नग्नावस्थेत दिसत असल्याचेही रेड्डी यांनी पोलिसांना सांगितले आहे. रेड्डींच्या तक्रारीनंतर हे समोर आलेलं हे प्रकरण नेमकं काय आहे सविस्तर जाणून घ्या..

इंडियन एक्सप्रेच्या माहितीनुसार, कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथील भाजप आमदार टीप्पा रेड्डी यांना ३१ ऑक्टोबरला एक कॉल आला, थोड्यावेळाने याच नंबरवरून व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल करण्यात आला. फोन उचलल्यावर समोर एक नग्नवस्थेतील अनोळखी तरुणी हिंदीत बोलत होती. काहीच वेळात याच नंबरवरून रेड्डी यांना काही व्हिडीओ पाठवण्यात आले ज्यात ही तरुणी व रेड्डी यांचा चेहरा दिसत होता

दरम्यान, चित्रदुर्ग सायबर क्राईम पोलिसांनी टीप्पा रेड्डी यांच्या तक्रारीनंतर माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम ६७ ए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. २०१९ मध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यापासून रेड्डी कर्नाटक मंत्रिमंडळात पदासाठी इच्छुक आहेत. चित्रदुर्गातील मुरुगा मठाच्या प्रमुख पुजाऱ्याला सप्टेंबरमध्ये मठाद्वारे चालवल्या जाणाऱ्या वसतिगृहात विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती, हे प्रकरण रेड्डी यांनीच उचलून धरले होते.

कर्नाटकात मागील काही वर्षांत ऑनलाइन ब्लॅकमेल आणि ‘सेक्स्टॉर्शनाची’ अनेक प्रकरणे समोर आली आहेत, यातून काहींनी आत्महत्या केल्याचेही समजत आहे. मार्च २०२१ मध्ये, राजस्थानच्या एका टोळीने विद्यार्थ्याला ‘सेक्स्टॉर्शन’ प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला होता यामुळे या एमबीएच्या विद्यार्थ्याचा आत्महत्या करून मृत्यू झाला. याशिवाय देशभरात सुमारे ४००० ‘सेक्स्टॉर्शन’ प्रकरणांमध्ये अशाच पद्धतीने फसवल्याचे दिसून आले आहे. सेक्स्टॉर्शनमध्ये एखाद्याला खाजगी व संवेदनशील माहिती ऑनलाईन लीक करण्याच्या धमक्या देऊन ब्लॅकमेल केले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.