‘सांबर, हरीण’ यांची शिकार करुन मांस विक्री करणारी आंतरराष्ट्रीय टोळी गजाआड
कोल्हापूर, चंदगड पोलिसांची कारवाई
चंदगड : चंदगड आणि आजूबाजूच्या परिसरातील वन्य प्राणी, सांबर, हरण यासारख्या प्राण्यांची शिकार करुन ते मांस आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठवणाऱ्या टोळीला चंदगड पोलिसांनी गजाआड केले आहे.
तुडीये कोलिक रोडवर चंदगड पोलिसांची पाहणीपथक रात्रगस्त करत असताना एका पोल्ट्री जवळ 10-12 इसम चार वाहनासोबत संशयितरित्या दिसून आले.यावेळी पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांना हटकले असता यांतील सर्व इसम पळून जाऊ लागल्यामुळे त्यातील दोन इसमांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्या वाहनांची चौकशी केली असता स्नॅपर रायफल व वन्य प्राण्याचे मास यावेळी आढळून आले. यांविषयी वनविभागाचे अधिकारी प्रशांत आवळे यांना माहिती देऊन घटनास्थळी बोलावून वाहनाची तपासणी केली असता सांबर सदृश्य प्राण्याचे मास मिळून असल्याचे समोर आले.
या कारवाईमधील आरोपी हे आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता असून त्याबाबत अधिक तपास सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक नितेश खाटमोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड पोलीस व वन विभागाने संयुक्तरीत्या केली आहे.सदरची पुढील कारवाई एसीएफ एन एस कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली प्रशांत आवळे वनपरिक्षेत्र अधिकारी पाटणे फाटा हे करत आहेत.