मुंबई : सीमावर्ती भागात महाराष्ट्राच्या वाहनांवर होणारे हल्ले 24 तासांत हल्ले थांबले नाहीत, तर बेळगावला जाऊ. बोम्मईंच्या वक्तव्याने देशाच्या ऐक्याला धोका निर्माण होतोय. हे पाहता केंद्र सरकारला आता बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, असे खडेबोल गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक आणि केंद्रातल्या मोदी सरकारला सुनावले.
महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादावर आज पवारांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. तसेच इतके होऊनही महाराष्ट्रातल्या जनतेची भूमिका संयमाची राहिली. परंतु संयमालाही मर्यादा असतात, असा इशाराही त्यांनी दिला.
महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादावर आज पवारांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. तसेच इतके होऊनही महाराष्ट्रातल्या जनतेची भूमिका संयमाची राहिली. परंतु संयमालाही मर्यादा असतात, असा इशाराही त्यांनी दिला.
शरद पवार म्हणाले, माझ्याकडे जी माहिती आहे ती चिंताजनक आहे. आज मला महाराष्ट्र एकीकरण समितीकडून जे काॅल येत आहेत ते चिंता व्यक्त करणारे आहेत. एकीकरण समितीच्या कार्यालयासमोर पोलिस तैनात आहेत. समितीला निवेदन देण्यापासून मज्जाव केला जात आहे. मराठी लोकांवर बेळगावात दहशतीचे वातावरण आहे. कर्नाटकात 19 डिसेंबरला अधिवेशन असून त्यापूर्वी दहशत मराठी माणसांवर दडपशाही केली जात आहे.
शरद पवार म्हणाले, आज महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांवर जे हल्ले झाले, त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. महाराष्ट्र संयम बाळगत आहे. अजूनही बाळगेल. परंतु संयमालाही मर्यादा असतात. येत्या चोवीस तासात महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांवरील हल्ले थांबले नाही, तर त्या संयमाला वेगळी किनार मिळेल व त्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि कर्नाटक सरकार त्यासाठी जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
शरद पवार म्हणाले, सीमावादावर आम्ही संवेदनशील आहोत. महाराष्ट्राची भूमिका एका पक्षाची नाही. यावर सर्व पक्ष एकत्र आले आहेत. तेव्हा बैठका घेत न्यायालयात लढण्याचा निर्णय घेतला. आज ती लढाई न्यायालयात आहे. आपापली भूमिका मांडण्याची दोन्ही राज्यांना समान संधी आहे. परंतु, कर्नाटक सरकारकडून कायद्याचे उल्लंघन केले जात आहे.