सीमावाद : अमित शहा घेणार दोन्ही मुख्यमंत्र्यांची भेट

0

नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मध्यस्थी करणार आहेत. येत्या 14 डिसेंबरला अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अमित शहा व कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

सीमावादाच्या मुद्द्यावर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य केले म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पदावरून हटवावे, या मागणीसाठी राज्यातील खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. भेटीनंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी याबाबत माहिती दिली.

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोनवल बोलणे झाले आहे. मात्र, केंद्रीय गृहमंत्र्यांनी कर्नाटक व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी समोरासमोर बोलून समन्वयाने या वादावर तोडगा काढावा, अशी मागणी आम्ही केली. अमित शहा यांनी संवेदनशीलपणे हा मुद्दा समजून घेतला. ते 14 डिसेंबरला महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत.

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, सीमाभागातील नागरिक 1956 पासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. कर्नाटक सरकारकडून त्यांच्यावर अत्याचाराचा वरंवटा फिरवला जात आहे. आताही सीमाभागातील नागरिकांवर अत्याचार केला जात आहे. हे सर्व गृहमंत्री अमित शहा यांनी समजून घेतले आहे. ते लवकरच या वादावर तोडगा काढतील , असा विश्वास आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.