चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा कहर

0

नवी दिल्ली : चीनमध्ये पुन्हा एकदा वेगाने कोरोना संसर्ग पसरताना दिसत आहे. चीनमधील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. अनेक प्रांतामध्ये कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. या दरम्यान, हाँगकाँगमधील एका रिपोर्टने चिंता अधिक वाढवली आहे. हाँगकाँगमधील शास्त्रज्ञांच्या अहवालानुसार, एका संशोधनानुसार, चीनमध्ये 20 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे चीन सरकारने कोरोना निर्बंध हटवले आहेत.

ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, चीनमधील 1.41 बिलियन लोकसंख्येच्या आधारावर सुमारे 9,64,400 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होईल. हाँगकाँगमधील शास्त्रज्ञांनी सांगितलं की, संशोधनानुसार चीनमधील सर्व प्रांतांमध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रसार थोपवण्यात आणि संसर्गाचा सामना करण्यात आरोग्य प्रशासन असमर्थ ठरेल.

संशोधकांच्या रिपोर्टनुसार, चीनमध्ये पर्यंत कठोर निर्बंध आणि लॉकडाऊन लागू करण्याची आवश्यकता आहे. जानेवारी 2023 चीनमधील लॉकडाऊन हटवण्यात येऊ नये. कोरोना लसीकरणात वाढ आणि अँटीव्हायरल औषधांचा पुरेसा साठा यामुळे कोरोना मृत्यू कमी करण्यात मदत होईल. यामुळे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 26 टक्क्यांनी कमी होईल.

चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर सुरु आहे. अशातच सरकारने पुन्हा एकदा झिरो कोविड नियम लागू केले होते. मात्र, नागरिकांनी सरकारविरोधात आंदोलन करत सरकारला निर्बंध मागे घेण्यास भाग पाडले. त्यामुळे सरकारने गेल्या आठवड्यापासून कोविड निर्बंध शिथिल केले आहेत. पण परिणामी चीनमधील परिस्थिती अधिक बिघडत चालली आहे. कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. राजधानी बीजिंगमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. व्हायरल फ्लू आणि ताप या सारख्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.