दिल्लीच्या घटनेने संपूर्ण देश हादरला!

0

नवी दिल्ली : देशातल्या पालकांची आपल्या पाल्याची चिंता आणि भीती वाढवणारी धक्कादायक घटना दिल्ली येथे घडली आहे. शुक्रवारी सकाळी दिल्लीच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टमध्ये पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाने पहिल्या मजल्यावरच्या वर्गातून फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली.

शाळकरी मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गीता देशवाल (वय 26) या शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे. फिलीमिस्तानसमोरील मॉडेल वस्ती परिसरातील निगम प्राथमिक बालिका विद्यालयात ही घटना घडली.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षिका गीता देशवाल हिने सकाळी वर्गात प्रवेश केला आणि आतून कुलूप लावले. विद्यार्थ्यांना शिवीगाळ केली आणि मुलीवर हल्ला करण्यापूर्वी पाण्याच्या काही बाटल्या फोडल्या. त्या नंतर तिने वंदना या विद्यार्थिनीला छोट्या कात्रीने मारले आणि पुढे पहिल्या मजल्यावरून ढकलले. तिने असे का केले? हे अद्याप समजले नाही. 

Leave A Reply

Your email address will not be published.