मुंबई : दीपाली सय्यद यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना ठार मारण्याचा कट रचल्याचा खळबळजनक दावा माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे एकाच खळबळ उडाली आहे. अहमदनगरमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.
दीपाली सय्यद ट्रस्टतर्फे होणारे व्यवहार चुकीचे आहेत, तसेच त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा जीवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप देखील त्यांनी केला.अयोध्या दौऱ्यात राज ठाकरेंची हत्या करण्याचा कट रचला होत.
दिपाली सय्यद आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी हा कट आखला होता त्या साठी अनेक वेळा दिपाली सय्यद दिल्लीला गेल्या होत्या. दिपाली सय्यद यांनी जवळपास 17 ते 18 दिल्लीच्या वाऱ्या केल्या होत्या असा गंभीर आरोप माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी अहमदनगर येथील पत्रकार परिषदेत केला आहे.
माझ्या संरक्षणाची जबाबदारी राज्य शासनाने घ्यावी तर मी 30 जानेवारी रोजी अहमदनगर मध्ये पुन्हा पत्रकार परिषदेत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, इकबाल कासकर आणि सलीम फ्रूटवाला याच्या बरोबर दिपाली सय्यद यांचे जे आर्थिक व्यवहार आहेत. त्यांच्या मद्यमातून दिपाली सय्यद यांच्या ट्रस्टला हजारो कोटी रुपये पुरवले जाते याचे पुरावे ऑडिओ सहित घ्यायला तयार आहे असेही भाऊसाहेब शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.