राज्यात कोरोनाचे रुग्ण ‘या’ दोन शहरात जास्त

0

मुंबई : कोरोनाच्या नवीन व्हेरियंटने जगभरात थैमान घातलं आहे. याचीच धास्ती संपूर्ण जगाने घेतली असून कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रात पुणे आणि मुंबईमध्ये करोना रुग्ण सक्रिय असल्याची संख्या सर्वाधिक आहे. मुंबईमध्ये ४९ रुग्ण सक्रिय आहेत तर पुण्यामध्ये ४६ कोरोना रुग्ण सक्रिय आहेत. महाराष्ट्रासह भारतासाठी हा चिंतेचा विषय झाला असून योग्य ती खबरदारी घेण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने आव्हान केले जात आहे.

कोरोना पुन्हा डोकं वर काढत असताना राज्यात सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आणि सॅनिटायझर सोबत ठेवण्याचा आवाहन केलं जात आहे. ठिकठिकाणी मंदिर प्रशासन देखील परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत मास्क वापरण्याचं आव्हान करत आहे. विमानतळावर परराज्यातून येणाऱ्या नागरिकांची करोना चाचणी केली जात आहे. त्याचसोबत बूस्टर डोस ज्या नागरिकांचा घ्यायचा राहिला आहे त्यांना देखील आपले डोस पूर्ण करण्याचं आव्हान करण्यात येत आहे.

चीनमध्ये करोना व्हायरसचा जन्म झाला आणि तो सगळीकडे पसरला. सगळ्या जगाला कोरोनामुळे लॉकडाऊनला समोरे जावे लागले होते. मात्र, आता कोरोनाचा नवीन व्हेरियंट पुन्हा धुमाकूळ घालत आहे. महाराष्ट्रामध्ये पुणे आणि मुंबईमध्ये याचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण असून देशासाठी ही मोठी चिंतेची बाब आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.