मजुरांना घेऊन निघालेल्या टेम्पोला भीषण अपघात; जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार

0

सातारा : 38 मजुरांना घेऊन निघालेल्या टेम्पोला भीषण अपघात झाला आहे. टेम्पोमध्ये लहान मुलांसह दोन गरोदर महिलाही होत्या. जखमींवर महाबळेश्वरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. टेम्पो दरीत कोसळल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर येथे घडला.

महाबळेश्वर जवळ तापोळा रस्त्यावर असलेल्या मुगदेव घाटात हा टॅम्पो दरीत कोसळला.

अपघातातील जखमींना महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून दोन गंभीर जखमी लहान मुलांना सातारा येथील सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्याला सुरुवात केली आहे.

सह्याद्री ट्रेकर्सच्या संजय पार्टे, दीपक जाधव, गायकवाड या कार्यकर्त्यांनी जखमींना मदत केली. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अजून कुठलीही माहिती समोर आलेली नाही. मात्र टेम्पोमध्ये एकूण 38 मजूर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.