महाविकास आघाडीच्या काळात फडणवीस, शेलार, राणे, महाजन यांना अडकविण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री शिंदे

0

 

मुंबई : रवी राणांच्या पत्नीला आत घातले. कंगना राणावतचे घर तोडले. गिरीश महाजन, नारायण राणे, देवेंद्र फडणवीसांच्या कुटुंबाची चौकशी लावली. आशिष शेलारांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाला. आपण असे केले. काय? जयंतराव मला माहिती आहे. दादांनाही माहिती आहे. असे प्रकार केले. हे जास्त काळ चालत नाही.

एकनाथ शिंदे म्हणाले, तुम्ही गुन्हा न करता मॉलमध्ये जाऊन माणसांना माराल, असे कसे होईल. जितेंद्र आव्हाड आपले चांगले मित्र आहेत. मात्र, सुप्रीम कोर्टाने आपली दखल घेऊन तपास करण्याच्या पोलिसांना सूचना केल्यात. मोठ्याने बोलले म्हणून सत्य लपत नाही, असा टोला त्यांनी हाणला.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात साधू हत्याकांड, संभाजीनगर दुर्दैवी घटना, साकीनाका दुर्दैवी घटना, मनसुख हिरेन प्रकरण घडले. तुम्ही आता गुन्ह्याची आकडेवारी दाखवली. मात्र, आता गुन्ह्याची नोंद होत आहे. दखल घेतली जात आहे. गुन्हेगाराला आळा घालण्याचे काम सरकार करणार आहे, असा निर्धार शिंदे यांनी व्यक्त केला.

एकनाथ शिंदे म्हणाले, एमपीएससीच्या पोरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्हाला चालवायची आहे. एमपीएससीचे सगळे प्रश्न सोडवणार. सगळी पदे भरली आहेत. सहा सदस्य झालेत. आता अ, ब गटाचे पद भरत आहेत. ज्या दिवशी मुलाखत, त्या दिवशी निकाल हाती पडले, असे आश्वासनही त्यांनी दिले.

निवडणूक आयोग की लोकसेवा आयोग ह महत्त्वाचे नाही. निर्णयाला महत्त्व आहे. मी श्रेय घ्यायला गेलो नाही. लोकांच्या भावनांशी खेळायचे नाही. मी खुल्ला बोललो. तुम्ही पन्नास केस करून ठेवलेत. मी बोललो, खुलासा दिला. मी असे बोललो का, की मला आत्मक्लेश करायला यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीकडे जावे लागेल. दादा रेफरन्स येतो ना. काळजी करू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.